सूचना:

महाराष्ट्रातील युजर फ्रेंडली संकेत स्थळावर आपले हार्दिक स्वागत  । आता आपण आपले  शैक्षणिक उपक्रम संकेतस्थळावर लिहू शकता  । आपल्याकडे  असणारे फलक लेखनाचे  नमुने  आम्हाला पाठवा आपल्या नावासहित ते संकेत स्थळावर प्रसिध्द केले जातील

पर्यावरणपूरक होळी व रंगोत्सव

उपक्रमाचे नाव :- पर्यावरणपूरक होळी व रंगोत्सव

शिक्षकाचे नाव :- विनायक जानराव लकडे

शाळेचे नाव :- जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा, वासेवाडी. पं.समिती:भातकुली,जि.अमरावती.

मोबाईल नं :- 9403312555

IP Address :- 106.77.29.246

उपक्रम

मी माझ्या शाळेत गेल्या पाच वर्षापासून पर्यावरणपुरक होळी साजरी करीत आहो. यानिमीत्त विद्यार्थी होळीच्या दिवशी सकाळी शालेय परिसराची केरकचरा वेचून स्वच्छता करतात. सडामार्जन करून मुली रांगोळी टाकून या ठिकाणी केरकचरी जमा करतात. त्यानंतर या होळीची विधीवत पुजा केली जाते. तत्पूर्वी शालेय परिसरातील एका वृक्षाचे मुलांच्याच हस्ते पूजन करण्यात येते. त्यानंतर होळी पेटविण्यात येते. यादरम्यान अनेक विद्यार्थी वृक्षारोपन व वृक्षसंवर्धनाविषयी माहीती देतात.वृक्षाची कटाई होत असल्याने जागतिक तापमानात वाढ होत असल्याची माहीती देण्यात येते. याशिवाय रासायनिक रंगाचा त्वचेवर कसा परिणाम होतो. याविषयी विद्यार्थी माहीती सांगतात. व रंगपंचमीला नैसर्गिक रंगाची उधळण करतात. उपक्रमाचा हा परिणाम दिसून आला. सण आणि उत्सवाच्या माध्यमातून मी विविध उपक्रम राबवित आहे. धन्यवाद!

 

उपक्रम लिहण्यासाठी येथे क्लिक करा
सर्व उपक्रम यादीसाठी येथे क्लिक करा